सनियंत्रण समितीच्या दिरंगाईमुळेच ई-रिक्षा बंद

माथेरान (प्रतिनिधी) : माथेरानकरांना हवीहवीशी वाटणारी सुलभ, स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणारी ई-रिक्षाची सेवा सनियंत्रण समितीच्या दिरंगाईमुळे धूळखात पडून आहेत. या समितीच्या गलथान कारभाराबाबत स्थानिक भूमिपुत्रांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



माथेरान हे प्रदूषणमुक्त ठिकाण असल्याने इथे पऱ्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने ५ डिसेंबर २०२२ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी रिक्षा सुरू केल्या होत्या. त्यावेळी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. सर्वांनीच याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला होता. शालेय विद्यार्थी, अपंग, रुग्ण त्याचप्रमाणे पर्यटकांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास या माध्यमातून मिळाला होता. महिंद्रा कंपनीच्या एकूण सात रिक्षांच्या साहाय्याने तीन महिने पर्यटनाला उत्तम प्रकारे चालना मिळाली होती.



५ मार्चपर्यंत रिक्षाची मुदत संपुष्टात आल्यानंतर याबाबतचा अहवाल नगर परिषदेने सनियंत्रण समितीला सुपूर्द करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यासाठी दिला होता. सदर अहवाल सनियंत्रण समितीने २४ एप्रिल पूर्वी सादर करणे अपेक्षित होते; परंतु या समितीने अहवाल सादर केला नाही. सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेल्या या समितीच्या पदाधिकाऱ्यांना एखादी विधायक आणि लोकांना अभिप्रेत कामे करणे शक्य होत नसेल, तर ही समिती बरखास्त करून टाकावी आणि शासनाने जनतेला आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवासुविधा प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.



सभा झालीच नाही



या पूर्वीच्या रंगनाथन व विलास गोरडे यांच्या कार्यकाळात सनियंत्रण समिती माथेरानला सभा घेत असे, त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्यासोबत संवाद साधता येत असे, के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली याच समितीने दीड वर्षांत एकही सभा माथेरानला घेतलेली नाही.


"सनियंत्रण समितीचे सदस्य डेविड कार्डोज यांनी ई-रिक्षाची चाचणी पावसाळ्यात करणे सुद्धा आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. कोर्टात तत्काळ सूनवाई न मिळाल्यास पावसाळा संपेल, कारण सध्या कोर्टाला सुट्टी आहे. जुलैमध्ये कोर्ट सुरू होईल. तोपर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून आणलेल्या या ई- रिक्षा नादुरुस्त होण्याची भीती श्रमिक हातरिक्षा संघटनेकडून व्यक्त केली जात आहे".
- शकील पटेल, अध्यक्ष, श्रमिक रिक्षा संघटना

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक