Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणशिवरायांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सहस्र जलकलश अभिषेकाचा संकल्प

शिवरायांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सहस्र जलकलश अभिषेकाचा संकल्प

राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक सोहळ्याची यंदा रायगडावर जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी सहस्र जलकलश अभिषेकाचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. या जलाभिषेकासाठी आज १,१०८ पवित्र जलकलश आणण्यात आले. या जलरथ यात्रेचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १ आणि २ जून रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा महाराष्ट्र सरकारच्या वतीने साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -