'शासन आपल्या दारी' नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवेल : आ नितेश राणे

  243

देवगड: 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत जाणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर याच अभियानातून नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण होणे गरजेचे आहे. ही योजना कणकवली मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीने राबवा की संपूर्ण महाराष्ट्रात हा पायलट प्रोजेक्ट ठरला पाहिजे. शासन आपल्या दारी अभियान हे नागरिकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवेल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.


राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे करण्यात आला. याचवेळी देवगड तालुका स्तरीय कृषी प्रदर्शनाचाही शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना विविध लाभ व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी जगदीश कातकर, देवगडच्या गटविकास अधिकारी नायर, तहसीलदार स्मिता देसाई, माजी आमदार अजित गोगटे तसेच सर्व तालुक्याचे कार्यालय प्रमुख यावेळी उपस्थित होते


नितेश राणे यांनी शासन आपल्या दारी अभियानात लावलेल्या विविध खात्याच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी योजना पोहोचवण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारी निवारण करा, अशा सुचना केल्या. त्याचबरोबर कृषी प्रदर्शनातील विविध विक्री स्टॉलला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन दिले. आपण या योजनांचा आढावा दर महिन्याला घेणार असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार स्मिता देसाई यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी बोलताना संपूर्ण कणकवली विभागामध्ये २१ मंडळे असून या सर्वच मंडल स्तरावर शासन आपला दारी कार्यक्रम दर महिन्याला केला जाईल असे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण