ज्येष्ठ समाजवादी नेते रविंद्र वैद्य यांचे निधन

जव्हार : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल गुरुवार, २५ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे.


प्रजा समाजवादी पक्ष सुरु करुन आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. गोवा व दमण मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.


साप्ताहिक आहुती बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाबरोबरच मराठी पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.


१९९७ साली त्यांच्या पत्नी सौ. नीला यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र वैद्य यांची प्रकृती ढासळत होती. यातूनही गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. मात्र काल फारच प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या