आता पोस्टातसुद्धा जमा करू शकता दोन हजारांची नोट

मुंबई (प्रतिनिधी) : दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये बदलून मिळत आहेत. त्यासाठी आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा जमा करता येणार आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर लोकांमध्ये आज काही प्रमाणावर संभ्रमाचे वातावरण आहे. तुम्ही एकतर २ हजार रुपयांची नोट बदलू शकता किंवा तुम्ही पुढील ४ महिन्यांसाठी तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. दोन हजारांच्या नोटा बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत. यापुढे तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा जमा करता येणार आहेत. तुम्ही या नोटा फक्त जमा करू शकता. त्या तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, असे पोस्ट ऑफिसकडून सांगण्यात येत आहे.


रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दोन हजार रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदलता येणार आहे. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. त्याचे कारण पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात दोन हजार रुपयांची नोट जमा करू शकता. कारण दोन हजारांची नोट कायदेशीर निविदा राहते. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र यासाठी ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे. त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे. २३ मे २०२३ पासून २ हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य