देशातील पहिल्या ‘AI’ विद्यापीठाचा मान महाराष्ट्राला

  519

व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम


मुंबई : देशातील पहिले 'एआय' विद्यापीठ १ ऑगस्टपासून कर्जतमध्ये सुरु होणार आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता प्रेरित शिक्षण देणारे हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विद्यापीठाला मंजुरी दिली आहे.


या विद्यापीठासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. १ ऑगस्टपासून पहिले शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. विद्यापीठाने एआय आणि फ्युचर टेक्नॉलॉजीतील पदवी आणि विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केला आहे.


एआय प्रेरित शिक्षणाला समर्पित पहिले विद्यापीठ म्हणून नवीन युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम देऊ करेल. तसेच लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रिडी विज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही तयार केले आहेत.


युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलपती व संस्थापक प्रा. तरुणदीप सिंग आनंद म्हणाले की २१व्या शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले समर्पित एआय विद्यापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे.


आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असे म्हटले जाते. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापिठाची स्थापना करण्यात आली आहे.


यामध्ये ग्रीन कॅम्पस असेल आणि त्याला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी या विद्यापिठामध्ये १ ऑगस्टपासून पहिले शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. येथे १ ऑगस्टपासून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिलं जाईल. यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण दिलं जाणार आहे. या मुंबई विद्यापिठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कॉम्प्युटर आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे. तसेच जागतिक घडामोडी आणि मुत्सद्देगिरी, कायदा, पर्यावरण आणि क्रीडा विज्ञान यासारखे इतर नवे-जुने संमिश्र अभ्यासक्रम तयार केले आहेत. जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी एआय शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचं आहे.


या विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा चा वापर केला जाईल. तरुणांना ऑगमेंटेड रिॲलिटी, मिक्स्ड रिॲलिटी, आयओटी, ब्लॉकचेन यांवर शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा