सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे चित्र बदलणार असून आम्ही २४ तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं.


रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्रंही देण्यात आली.


मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपल्याला मदत करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतल्या नऊ तालुक्यांमधून दहा हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित होते. शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे २० विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पूरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेली १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकल व चार बसेसचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण