मुंबई: ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये जॅस्मिनच्या भूमिकेने सर्वांना हसवणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा कार अपघातात मृत्यू झाला. शोचे निर्माते आणि दिग्दर्शक जे. डी. मजेठिया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत हिमाचल प्रदेशमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले. तिच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, वैभवी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कारने येत होती. अचानक वळणावर कारचे नियंत्रण सुटले आणि कार खड्ड्यात पडली, त्यात वैभवीचा मृत्यू झाला. तिच्या पतीची प्रकृती स्थिर आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती पण शोच्या निर्मात्यांनी बुधवारी याची माहिती दिली.
निर्माते जे. डी. मजेठिया यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. साराभाई vs साराभाई मधील ‘जॅस्मिन’ म्हणून ओळखली जाणारी एक अतिशय चांगली अभिनेत्री, खास मैत्रीण वैभवी उपाध्यायचे निधन झाले. कुटुंबीय तिला उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कारासाठी आणतील. RIP वैभवी, “
आज अभिनेता नितेश पांडे याचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तसेच दोन दिवसांपूर्वी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचाही मृत्यू झाला होता.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…