Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीसावरनेरमधील खाडेवाडीत चक्क जन्मदात्या आईचं मंदिर

सावरनेरमधील खाडेवाडीत चक्क जन्मदात्या आईचं मंदिर

खाडे भावंडांची आपल्या आईप्रती कृतज्ञता

सावरनेर : ‘आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही’ असं म्हणत बीड जिल्ह्यातील सावरनेरमधील खाडेवाडीत खाडे भावंडांनी चक्क आपल्या जन्मदात्या आईचं मंदिर बांधलं आहे. आईची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी म्हणून आईची हुबेहूब मूर्ती बनवून घेत या तीन भावंडांनी ती मूर्ती मंदिरात स्थापन केली आहे.

वर्षभरापूर्वी राधा खाडेंचं हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झालं. त्यामुळे तीन भावंडं पोरकी झाली. आईच्या प्रेमाखातर आर्थिक उत्पन्नाचा स्रोत केवळ शेती आणि ऊसतोडी असतानादेखील या मंदिराच्या उभारणीसाठी खाडे भावंडांनी ९ लाख रुपये इतका खर्च केला.

“कितीही देवांच्या पाया पडलं तरी आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय गुण येत नाही म्हणून आम्ही हे मंदिर बांधलं” असं थोरला भाऊ म्हणाला.

“आई एवढी प्रेमळ होती की तिची तुलनाच करु शकत नव्हतो. आईचं सतत स्मरण व्हावं असं वाटत होतं. आई अविस्मरणीय रुपात आमच्यासमोर राहावी म्हणून आम्ही भावंडांनी आईचं मंदिर बांधायचं ठरवलं”, हे बोलताना धाकल्या भावाला भरुन आलं.

माझे दोन्ही भाऊ नोकरी करत नसूनही केवळ शेतीच्या उत्पन्नावर त्यांनी हे जगावेगळं काम केलं आहे. आता अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव निघत आहे, अशी भावना बहिणीने व्यक्त केली.

असं कधीच कोणी केलं नव्हतं त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात लागेल, या मंदिराच्या माध्यमातून पुढील पिढीला एक नवा आदर्श मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -