ममता बॅनर्जींना धक्का! 'द केरळ स्टोरी' पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होणारच

नवी दिल्ली: लव्ह जिहाद या विषयावर भाष्य करणारा 'द केरळ स्टोरी'च्या पश्चिम बंगालमधील प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पश्चिम बंगाल सरकारकडून या चित्रपटावर बंदी घालण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'वर लादण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने दिलेला हा निर्णय ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.


याबाबत कोर्ट म्हणाले, "आम्ही ८ मे रोजी पश्चिम बंगाल सरकारने द केरळ स्टोरी या चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत. या बंदीला कोणताही ठोस आधार नाही." सर्वोच्च न्यायालयातदिलेल्या प्रतिज्ञापत्रात, पश्चिम बंगाल सरकारने म्हटले होते की 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बनावट तथ्यांवर आधारित आहे आणि त्यात द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज या चित्रपटावरील बंदी उठवत पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय स्थगित केला आहे.


'द केरळ स्टोरी' ला रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या १३ दिवसांतच चित्रपटाची एकूण कमाई १६५.९४ कोटी इतकी आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'द केरळ स्टोरी' चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला