जागा वाटपावरून मविआत बिघाडी?

ठाकरे गटाने 'या' दोन लोकसभा मतदारसंघासाठी धरला हट्ट


मुंबई : महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे. लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून २० जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तीनही घटकपक्ष लोकसभेच्या समान प्रत्येकी १६ जागा लढवणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे.


महाविकास आघाडीकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र त्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते लोकसभा निवडणुकीत समाना जागांचं वाटप होणार असल्याचं बोलत आहेत. मात्र यावरून २०१९ मध्ये १८ जागा जिंकणाऱ्या ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाकडून जिंकलेल्या १८ मतदारसंघासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदार संघावर देखील दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जागावाटपावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.


छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलिल आहेत. तर अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या दोनही मतदारसंघावर आता ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर ठाकरे गट ठाम असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल...

सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील १२ वर्षीय

भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली

अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय

युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं