रिफायनरी संदर्भातील आंदोलनकर्त्यांना बजावलेले मनाई आदेश प्रशासनाकडून रद्द

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आला होता. हे जारी केलेले आदेश क्र. जिविशा/रिफायनरी प्रकल्प/ ३२४५ - ३२५० / २०२३ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांच्या११ मे पत्राच्या आनुषंगाने मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.



ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते व हे आदेश आता रद्द करण्यात आले, त्या संबंधित व्यक्तींची नावे व पत्ता- १) देवाप्पा अण्णा शेट्टी उर्फ राजू शेट्टी, रा. अर्जुनवाड रोड, ता.शिरोळ जि. कोल्हापूर, खासदार व अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, २) जनार्दन पाटील, रा.परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर, ३) अशोक केशव वालम, रा. नाणार, ता. राजापूर, जि.रत्नागिरी ४) जालिंदर पाटील, रा. राशिवडे बुद्रुक, जि. कोल्हापूर, ५) स्वप्नील सोगम, रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर जि. रत्नागिरी, ६) सत्यजित विश्वनाथ चव्हाण, रा.राम आनंद नगर हौसिंग सोसायटी, दहिसर पूर्व, मुंबई. संबंधित आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी रद्द केले आहेत.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!