कर्नाटकात भलेही विजय पण 'या' महत्वाच्या राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ

  169

विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची मुसंडी


रामपूर: कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला हार पत्करावी लागली असली तरी सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, सपाला विधानसभा सीट, नगरपालिकांसह पंचायत समित्यादेखील गमवाव्या लागल्या आहेत.


सपाच्या आझम खान यांच्या रिक्त झालेल्या रामपूरमधील स्वार टांडा पोटनिवडणुकीतील सीटवर भाजपासोबत असलेल्या अपना दलाचे शफीक अंसारी जिंकले आहेत. सपाने ही जागा वाचविण्यासाठी हिंदू उमेदवार दिला होता. मात्र, अनुराधा चौहान यांचा ९ हजार ७३४ मतांनी पराभव झाला आहे. भाजपाने आझम खान यांची लोकसभेची रामपूर सीटही आपल्या ताब्यात घेतली होती. तसेच त्यानंतर विधानसभेची सीटही ताब्यात घेतली होती.


तर, दुसरीकडे नगर परिषद, नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या महापौरपदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतही भाजपाने सपा, काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. १७ पैकी १७ नगर परिषदांवर भाजपाचा विजय झाला आहे. तर १९९ नगर पालिकांपैकी भाजपाने ८८, सपाने ३५, काँग्रेस ५, बसपा २१ आणि इतर ५० जिंकल्या आहेत. तर ५४४ नगर पंचायतींपैकी भाजपाने आपल्याकडे १६९ पंचायतीवर विजय प्राप्त केला आहे. सपाने ७२, काँग्रेस ७, बसपा ३५ आणि इतर १५० जिंकल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस जिंकली असली तरी उत्तरेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.

Comments
Add Comment

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण