अब तेरा क्या होगा संजय राऊत?

कणकवली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत यांनी 'नंगा नाच' असा उल्लेख केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. संजय राऊत यांना अजून अक्कलदाढ आली नसल्याचं त्यांनी स्वतःच दाखवून दिलं आहे, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. संजय राऊत जगातला सर्वात मोठा मूर्ख आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

"नंगा नाच याबद्दल विश्लेषण कोणी करावं, तर संजय राऊत यांनी? तर मग मुंबईच्या आरे गेस्ट हाऊसमध्ये कोणता नंगा नाच होत होता याबद्दल त्यांनी माहिती द्यावी. दुसर्‍यांना नंगा बोलण्याआधी स्वतः कुठे कुठे कपडे काढले, याबद्दल सांगावं. नसेल जमत तर आम्ही नंगा नाच कशाला म्हणतात याची लिंक काही दिवसांत दाखवतो", असे खडेबोल यावेळी नितेश राणेंनी सुनावले.

पुढे नितेश राणे म्हणाले, "आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दोन्ही अनिलचे आभार मानले. आम्हीदेखील अनिल परब, अनिल देसाई आणि संजय राऊत यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे आज संपलेला माणूस आहे. म्हणून या तिघांचा नागरी सत्कार करण्याची संधी आम्हाला द्यावी". त्याचबरोबर प्रत्येक कोर्टामध्ये, निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहणारे अनिल देसाई कालच्या महत्त्वाच्या सुनावणीला कोर्टात का गेले नव्हते? असा सवाल उपस्थित करत हे उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

हे सरकार बेकायदेशीर असून ते तीन महिनेच टिकणार आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. "हे सरकार आता अधिक भक्कम झालंय. माननीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहेत", असा विश्वास नितेश राणेंनी यावेळी दिला.

'अब तेरा क्या होगा संजय राऊत?' असा फिल्मी डायलाॅग मारत नितेश राणेंनी राऊतांना चांगलीच चपराक दिली आहे. सरकार तीन महिने टिकतंय की संजय राऊतांवर पुन्हा कैदी नंबर ८९, ५९ बनण्याची वेळ येतेय हे आपण बघू, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊतांना पत्राचाळीतल्या मराठी माणसांचे शाप लागणार, त्यांनी नैतिकतेची भाषा करु नये, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.
Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!