कोकण मार्गावर आणखी दोन अनारक्षित उन्हाळी स्पेशल धावणार

  143

खेड (प्रतिनिधी) : कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी सेंट्रल रेल्वेने आणखी दोन अनारक्षित साप्ताहिक उन्हाळी स्पेशल जाहीर केल्या. पुणे-रत्नागिरीसह रत्नागिरी-पनवेल अनारक्षित स्पेशल गाड्यांचा समावेश आहे. या स्पेशल गाड्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी गर्दीची तीव्रता कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


०११३३ /०११३४ क्रमांकाची रत्नागिरी-पनवेल अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी ५, १२, १९, २६ मे रोजी धावेल. रत्नागिरी येथून दुपारी १ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८.२० वाजता पनवेल येथे पोहचेल.


परतीच्या प्रवासात पनवेल येथून रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता रत्नागिरीला पोहचेल. २२ डब्यांची स्पेशल संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगांव, रोहा स्थानकात थांबेल.


०११३१/०११३२ क्रमांकाची पुणे - रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावेल. ११, १८, २५ मे रोजी धावणारी स्पेशल पुणे येथून रात्री ८.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल.


परतीच्या प्रवासात दर शनिवारी ६, १३, २०, २७ मे रोजी धावणारी स्पेशल रत्नागिरी येथून दुपारी १ वा. सुटून त्याचदिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहचेल. २२ डब्यांची स्पेशल लोणावळा, कल्याण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर आदी स्थानकात थांबेल.
अजमेर-एर्नाकुलम कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने अजमेर-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेस डिझेलऐवजी विजेवर चालविण्याचे नियोजन केले आहे.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली