लागा गणेशोत्सवाच्या तयारीला...

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग १६ मेपासून सुरू करण्यात येणार आहे.



यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग येत्या १६ मेपासून सुरू होणार आहे.



कोकणात खास करून गणेशोत्सवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून कोकणातील गणेशोत्सवाला होणारी चाकरमान्यांची गर्दी आणि प्रवासातील गाड्यांचे वेळापत्रक पाहता तिकीट बुकिंगच्या दृष्टीनेही बरीच लगबग दिसून येते. त्यासाठी गणेशोत्सवाला चार महिने बाकी असतानाच खास कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षणासाठी १६ मेपासून बुकिंग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला तरी अजून चार महिने बाकी असले तरी प्रवासाच्या बुकिंगसाठी तरी चाकरमानी सज्ज होणार असल्याचे दिसून येणार आहेत.


रेल्वे गाड्यांच्या बुकिंगचे वेळापत्रक :-




  • १६ मे रोजी १३ सप्टेंबरच्या गाडीचे बुकिंग

  • १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे बुकिंग.

  • १८ मे रोजी १५ सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे बुकिंग.

  • १९ मे रोजी १६ सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे बुकिंग.

  • २० मे रोजी १७ सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे बुकिंग.

  • २१ मे रोजी १८ सप्टेंबर(हरितालिका तृतीया)

  • २२ मे रोजी १९ सप्टेंबर (श्रीगणेश चतुर्थी)

  • २३ मे रोजी २० सप्टेंबर (ऋषिपंचमी)

  • २४ मे रोजी २१ सप्टेंबर (गौरी आगमन)

  • २५ मे रोजी २२ सप्टेंबर २०२३ (गौरी पूजन)

  • २६ मे रोजी (गौरी विसर्जन)

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.