Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीविमानात महिलेला विंचूदंश

विमानात महिलेला विंचूदंश

मुंबई (वार्ताहर) : एअर इंडियाच्या विमानात एका महिलेला विंचू चावल्याची घटना घडली आहे. तातडीने त्या महिलेला विमानतळावर उतरल्यावर डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने शनिवारी दिली. ही घटना २३ एप्रिल रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी महिला काही कामानिमित्त नागपूरला गेली होती. महिला एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई फ्लाइटने परतत होती. निर्धारित वेळेत महिला विमानात बसली. त्यानंतर विमानानेही नियोजित वेळेवर उड्डाण केले. विमान आकाशात पोहोचताच अचानक या महिलेचा आरडाओरडा झाला. फ्लाइट अटेंडंटने तातडीने तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता महिलेला विंचू चावल्याचे समजले. ही बातमी ऐकून बाकीचे प्रवासीही घाबरले. या घटनेनंतर गोंधळात संपूर्ण विमानाचा शोध घेण्यात आला, मात्र विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर होत होती. रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली. डॉक्टरांनी तिला रात्रभर हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला.

विमान कंपनीच्या म्हणण्यानुसार, विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर विंचू सापडला. यानंतर कीड नियंत्रणाची योग्य प्रक्रिया विमानात करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -