बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीतील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बंगळुरूमध्ये पंतप्रधानांचा दोन दिवसीय रोड शो सुरू झाला आहे. पक्षाने रोड शोचे नाव ‘नम्मा बेंगळुरू, नम्मा हेम’ (आमचे बेंगळुरू, आमचा अभिमान) असे ठेवले आहे. पंतप्रधानांचा पहिला रोड शो सकाळी १० वाजता न्यू थिप्पासंद्रा येथील केम्पे गौडा पुतळ्यापासून सुरू झाला आहे. साधारण साडेचार तासांचा हा रोड शो ब्रिगेड रोडवरील वॉर मेमोरियल येथे दुपारपर्यंत संपेल. २६ किलोमीटर लांबीच्या या रोड शोला उपस्थित समर्थकांनी रस्त्याच्या दुतर्फा पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी केली. दोन दिवसीय रोड शोमध्ये दुस-या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळीदेखील १० ते दुपारी २:30 या वेळेत साडेचार तास लांबीचा रोड शो ते करणार आहेत.
कर्नाटकात १० मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकात थेट लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारीच बंगळुरूला पोहोचले आहेत.
याआधी ३६.६ किमीचा शो एकाच दिवसात करण्याचे योजले होते. मात्र शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये याकरता कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता हा शो दोन दिवसीय केला आहे. हा रोड शो शहरातील २८ पैकी १९ विधानसभा मतदारसंघातून जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले.
प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी बदामी आणि हावेरी येथेही जाहीर सभा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी नंजनगुड येथील श्रीकांतेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरात दर्शनाने प्रचाराची सांगता होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…