मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना २४ लसीकरण केंद्रांवर आता नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लस देण्यात येणार आहे. या कोरोना – १९ प्रतिबंधक लसीकरणाला आजपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मात्र ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.
पालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षं वयावरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले होते. कोरोना-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहेत. २६ एप्रिलअखेरपर्यन्त,२ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २८ एप्रिलपासून इन्कोव्हॅक ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्कोव्हॅक लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात येईल.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…