राजापूर (प्रतिनिधी): ‘एकमेकांशी होणाऱ्या संवादातून चांगली चर्चा होते व प्रश्न सुटू शकतात. तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रकल्प समर्थक आणि विरोधकांनी गुरुवारच्या बैठकीच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न आणि शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून यातून मार्ग काढावा हाच आपला प्रयत्न आहे. शेती, पर्यावरणाला हानी पोहचेल, प्रदूषण होईल याचे आम्हीही कधी समर्थन करणार नाही. मात्र हा प्रकल्प आपल्या देशाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपल्या शंकांचे निरसन करून, उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करूनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल’, अशी ग्वाही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिली.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा जीडीपी १.८ टक्क्यांनी, तर देशाचा जीडीपी पाच ते दहा टक्यांनी वाढणार आहे. विकासाची नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने या प्रकल्पाबाबत चांगली चर्चा करून, आपल्या शंकाचे निरसन करून घेऊन सकारात्मक भूमिका घेताना देशहित डोळ्यांसमोर ठेऊन या प्रकल्पाकडे पाहूया, असे आवाहन करताना रोजगार, शिक्षण, आरोग्य याबरोबरच ज्यांची जमीन या प्रकल्पात जात नाही. मात्र ते प्रकल्पग्रस्त आहेत, त्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून लाभ कसा होईल यासाठीही आपण प्रयत्न करू, तसा अहवाल शानसाला देऊ, असा विश्वासही सिंग यांनी यावेळी उपस्थित स्थानिक भूमिपुत्रांना दिला.
तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी, प्रकल्प विरोधक आणि प्रकल्प समर्थक यांची एक बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी गुरुवारी आयोजित केली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…