शिर्डी : कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साई मंदिर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.
अनेकदा शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारने मंदिराला केंद्रीय सुरक्षा पुरवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयास शिर्डीकरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि शिर्डी ग्रामस्थ अशा संघर्ष चिघळण्याची दाट शक्यता आहे.
बुधवारी आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत चार विषयांवर अनेकांनी आपापली मते मांडली. या सर्वांची मते विचारात घेऊन सोमवार १ मे रोजी संपूर्ण शिर्डी गाव बंद ठेऊन संध्याकाळी ६ वाजता ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कमांडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावर न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवली आहे. मात्र शिर्डीतील ग्रामस्थांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ भीक मांगो आंदोलन केले.
नागरिकांनी सीआयएसएफ नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. परंतु शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…