रिफायनरीकडे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, १७ पोलीस जखमी

  188

राजापूर : कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी आजपासून माती सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे. मात्र प्रकल्पविरोधी संघटना आणि ग्रामस्थांमुळे सर्वेक्षणाच्या या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. हा अडथळा रोखण्यासाठी प्रस्तावित रिफायनरीच्या सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला आज सकाळी कशेडी गावाजवळ अपघात झाला. यात १७ पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रिफायनरी सर्वेक्षणाच्या या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. हा अडथळा रोखण्यासाठी राजापूरच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी सर्वेक्षणाचे काम होणार्‍या १ किलोमीटरच्या परिसरात २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ म्हणजे जमावबंदी आदेश जारी केले आहेत.


रिफायनरी सर्वेक्षणास विरोध करणार्‍या कार्यकर्त्यांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी केली आहे. मात्र हे विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी बारसू, सोलगाव आणि आसपासच्या परिसरात जवळपास दीड ते दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


तसेच या परिसरात आज पोलिसांचे रूट मार्च काढण्यात येणार आहे. गावागावात ठिकठिकाणी नाकाबंदीदेखील केली आहे आणि काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत.


राजापूर तालुक्यात 'क्रूड ऑईल' रिफायनिंग करणार्‍या 'रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग' या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.


Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण