Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

अमृतपाल सिंहला अटक करण्यात अखेर पंजाब पोलिसांना यश

अमृतपाल सिंहला अटक करण्यात अखेर पंजाब पोलिसांना यश

मोगाः फरार खलिस्तानवादी अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी मोगा येथील गुरुद्वारातून अमृतपालला ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून अमृतपालसिंग फरार होता.


सुरुवातीला अमृतपालने मोगा पोलिसांना शरण गेल्याची चर्चा होती. मात्र, नंतर पंजाब पोलिसांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं आहे. पंजाब पोलिसांच्या ट्विटनुसार, अमृतपाल सिंहला मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारात तो असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पोलिसांनी अमृतसर येथे नेले व तिथून आसाममधील डिब्रूगढ जेलमध्ये रवाना केले.


दरम्यान, पोलिसांनी १८ मार्च रोजी अमृतपाल सिंह आणि त्याच्या 'वारिस पंजाब दे' या संघटेनेच्या सदस्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. समाजामध्ये अंसतोष पसरवणे, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला अशा काही प्रकरणांत अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदाराला घरात आश्रय देणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली होती.




Comments
Add Comment