Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईची प्रसिद्ध अभिनेत्री सेक्स रॅकेट प्रकरणी अटकेत

मुंबईची प्रसिद्ध अभिनेत्री सेक्स रॅकेट प्रकरणी अटकेत

मुंबई : मागील काही दिवसांपुर्वी मुंबईत आरती मित्तल या अभिनेत्री-कास्टिंग डायरेक्टरला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अटक केल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

२४ वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री (२१ एप्रिल) अटक केली आहे. तिच्यावर मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांना त्याच्या खब-यांकडून वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचत कारवाई करून गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे ही अभिनेत्री वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

सुमन कुमारी ही ५० ते ८० हजार रुपयांत मुली पुरवत होती. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा हॉटेलच्या खोलीत तीन मॉडेल्स संशयास्पद अवस्थेत सापडल्या.

दरम्यान, सुमन कुमारी हीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. तिचे ‘लैला मजनू’ आणि ‘बाप नंब्री, बेटा दस नंब्री’ यांसारख्या काही भोजपुरी चित्रपट गाजले आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे. तिने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -