मनसे कोंडीत, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा मैदान देण्यास नकार!

रत्नागिरी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ६ मे रोजी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर सभा होणार होती. याबाबतचे वृत्त मनसेने जाहीरही केले होते, परंतू आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीकडे विचारणा करण्यास गेले असता संस्थेने त्यांना जवाहर मैदानावर सभा घेण्यास नकार दिला. यामुळे सभेचा दिवस जवळ आलेला असताना मनसेची कोंडी झाली आहे.


मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू, आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी संस्थेत पोहोचले तेव्हा संस्थेने गेल्या १० वर्षांपासून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान दिलेले नाही. यामुळे या सभेलाही मैदान दिले जाणार नाही असे सांगितले. यामुळे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाच्या विषयावरून बैठक बोलावली आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर भाजपचे वर्चस्व असले तरी देखील या संस्थेने कोणत्याही राजकीय पक्षांना मैदान न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्य नेत्यांच्या सभा, कार्यक्रम दुसऱ्या मैदानांवर घेतल्या जातात. यामुळे मनसेकडे आता त्या मैदानांचा पर्याय उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या