जेष्ठांना मोफत एसटी प्रवास करू देण्यास वाहकाचा नकार!

मोफत एसटी प्रवास सवलत योजनेचा बोजवारा!


८३ वर्षीय वृद्धाकडून घेतले टिकीट!



  • बाळासाहेब भालेराव


मुरबाड : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने ७५ वर्षे पुर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता यावा या हेतूने १६ ऑगस्ट २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ७५ वर्षांपुढील वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र या योजनेचा बोजवारा उडालेला दिसत आहे.


आज दि. २१ एप्रिल रोजी ८३ वर्षाचे धोंडू पदु भला (रा. फागुळगव्हाण) हे मुरबाड बस डेपोच्या कल्याण अवसरी बसने मोरोशी ते टोकावडे अशा‌ १२ कि.मी. अंतरासाठी प्रवास केला. ते वयोवृद्ध असूनही त्यांच्याकडून १० रुपये टिकिट घेतले असल्याचे निदर्शनास आले.


मी कल्याण ते आळेफाटा प्रवास अधुन मधुन करतो. ही योजना सुरू झाल्यापासून कधीच टिकीट घेतले नव्हते. परंतू या वाहकाने तिकाटासाठी हट्ट धरला. मी संबंधित एसटी वाहक यांना विचारले असता, त्यांनी माझ्याशी हुज्जत घातली - धोंडु भला, प्रवासी


कितीतरी वयोवृद्ध बसमध्ये येतात, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. परंतु वयोवृद्धांकडून टिकीट घेतलेल्या संबंधित वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुरबाड बस आगार प्रमुख यांच्याकडे करित आहोत - राजेश भांगे, मुरबाड उप तालुकाप्रमुख शिवसेना

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक