नवी दिल्ली : छे, नाही, आम्ही शिवसेना भवनावर दावा करणार नाही, असे वारंवार शिंदे गटाने म्हटलेले असताना अखेर शिवसेना भवन, शाखा आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका एका वकिलाने थेट सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या याचिकेत शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. हा वकील शिंदे गटाशी संबंधित आहे की नाही? याची माहिती अजून समोर आलेली नाही.
काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्य नेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आशिष गिरी असे याचिका दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तसेच, कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा,” अशी मागणीही आशिष गिरी यांनी केली आहे.
अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून सर्वांची झोप उडवली आहे. या वकिलाने ही नवी याचिका कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या २४ तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली आहे. मात्र, कोर्टाने त्यावर अजून काही स्पष्टीकरण दिलेले नाही.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…