Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाIPL 2024आईपीएलचा ‘एल क्लासिको’

आईपीएलचा ‘एल क्लासिको’

वानखेडेवर आज मुंबई आणि चेन्नईत घमासान

  • वेळ : संध्या. ७.३० वा.
  • ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई

मुंबई (वृत्तसंस्था) : आयपीएलची ‘मोस्ट अवेटेड’ लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी मुंबईच्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आईपीएलच्या या ‘एल क्लासिको’ लढतीवर क्रिडा चाहत्यांचे लक्ष असेल. मुंबई या सामन्यातून पहिल्या विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो का? किंवा चेन्नई मुंबईवर भारी ठरणार हे शनिवारीच कळेल.

गेल्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने येतात तेव्हा आयपीएलमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळते.  हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण ५ विजेतेपदे जिंकली आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जने चार आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.  या दोन संघांमधील सामन्यांना एल क्लासिको म्हणूनही ओळखले जाते. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांमधील सामना नेहमीच अटीतटीचा होतो. चाहत्यांमध्येही या दोहोंतील सामन्याची जबरदस्त क्रेझ असते. यामुळेच आयपीएलमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध सीएसके सामन्याला ‘एल क्लासिको’ म्हटले जाते.

बंगळूरुकडून पहिला सामना हरल्यानंतर शनिवारी मुंबईचा दुसरा सामना चेन्नईसोबत आहे.  यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवण्यासाठी मुंबई संघ जोरदार तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मासाठी हा सामना सोपा नसेल. पहिल्या सामन्यात मुंबई बेंगळूरुकडून ८ विकेट्सने पराभूत झाले आहे, मात्र मुंबईने हंगामाची सुरुवात पराभवाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  यापूर्वीही असेच घडले आहे आणि मुंबईने हंगामाची सुरुवात पराभवाने करूनही चॅम्पियन म्हणून नाव कोरले आहे.  कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांचा अनफॉर्म मुंबईची या मोसमात आतापर्यंत सर्वात मोठी समस्या आहे.  या दोघांच्या निराशाजनक फलंदाजीमुळे मुंबईची फलंदाजी खिळखिळी झाली. तिलक वर्माने पहिल्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली, परंतु त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडली. मुंबईचे अन्य फलंदाज पहिल्या सामन्यात फेल ठरले. गोलंदाजीमध्येही विशेष अशी कामगिरी करण्यात मुंबईला अपयश आले.

दुसरीकडे पहिला सामना गमावल्यानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात लखनऊला पराभूत करून विजयाचा मार्ग पकडला आहे. त्यांचा ऋतुराज गायकवाड कमालीचा फॉर्मात आहे. मोईन अलीही आपली अष्टपैलू जबाबदारी चोख बजावतो आहे. मुंबईच्या तुलनेत चेन्नईचा संघ संतुलित दिसत आहे. कॉनवे, बेन स्टोक्स आणि रविंद्र जडेजासारखे क्लास वन खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहेत. मात्र त्यांना मैदानात कामगिरी उंचावावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -