हनुमानजी राक्षसांशी लढले, आपण भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी लढू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार


नवी दिल्ली : आज हनुमान जयंती, या हनुमानापासून भाजपला भ्रष्टाचार आणि कायदा सुव्यवस्थेशी लढण्यासाठी प्रेरणा मिळते. हनुमानजी राक्षसांशी लढले, आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी लढू, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला.


यावेळी स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, 'आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती साजरी करत आहोत. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचे जीवन आजही आपल्याला प्रेरणा देते. जर आपण भगवान हनुमानाच्या संपूर्ण जीवनावर नजर टाकली, तर त्यांच्याकडे "Can Do" वृत्ती होती. मी हे करू शकतो या वृत्तीमुळे त्यांना सर्व प्रकारचे यश मिळण्यास मदत झाली. जेव्हा लक्ष्मणजींवर संकट आले, तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत वाहून नेला. याच प्रेरणेतून भाजपनेही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही सुरू ठेवणार आहे. हनुमानजींच्या सामर्थ्याप्रमाणेच आज भारताला आपल्या सामर्थ्याची जाणीव होत आहे.


ते म्हणाले, 'आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानजींची जयंती साजरी करत आहोत. बजरंगबलीच्या नावाचा सर्वत्र जयघोष होत आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचे जीवन आजही आपल्याला प्रेरणा देते. भारताला बजरंगबलीसारख्या स्वतःच्या सुप्त शक्तींची जाणीव झाली आहे. बजरंगबलीकडे अफाट शक्ती आहे. या शक्तीचा वापर ते त्यांचा आत्मसंशय संपल्यानंतरच करू शकतात. २०१४ पूर्वी भारतातही अशीच परिस्थिती होती. भारताला आता बजरंगबलीसारखी आपल्यातील सुप्त शक्तींची जाणीव झाली आहे. हनुमानाच्या याच गुणांपासून भाजप कार्यकर्ते व पक्ष प्रेरणा घेतात. आमचा पक्ष भारत माता, संविधान आणि राष्ट्रासाठी समर्पित आहे, असेही त्यांनी सांगितले.


साम्राज्यवादी मानसिकता असलेल्या या लोकांना व पक्षांना एक गोष्ट कळत नाही. आज देशातील गरीब, सामान्य माणूस, तरुण, माता-भगिनी, शोषित-वंचित प्रत्येकजण भाजपच्या कमळाच्या रक्षणासाठी ढाल बनून उभा आहे. पण आमचा भर विकासावर, देशवासीयांच्या कल्याणावर आहे. आज सर्वसामान्य जनता भाजपची ढाल झाली आहे. पण हे विसरून चालणार नाही की, भाजपला एकविसाव्या शतकातील भविष्याचा पक्ष बनवायचे आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वासाला बळी पडू नका. २०२४ मध्ये भाजपला कुणीही हरवू शकत नाही, असे लोक आताच सांगत आहेत. हे खरे आहे. पण भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सर्वच नागरिकाची मने जिंकायची आहेत. ८० च्या दशकापासून आपण लढत आलो आहोत. त्याच तडफेने आपल्याला येणारी प्रत्येक निवडणूक लढवायची आहे, असेही मोदी म्हणाले.


दरम्यान, भाजप आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत विशेष सप्ताह म्हणून साजरी करणार आहे. पक्षाने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना यासंबंधी ११ एप्रिलला समाजसुधारक ज्योतीबा फुले व १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती सर्व बूथ, मंडल, जिल्हा व राज्य कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे