कॅगच्या अहवालात उघड झालेल्या मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करा

आमदार आशिष शेलार यांची मागणी


मुंबई : कॅगने केलेल्या चौकशीमध्ये पालिकेच्या ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला असून या मागचा सुत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड शेलार यांनी केली आहे.


पालिकेच्या ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळ्यावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते, त्याचे वर्णन करायचे तर 'कट, कमिशन आणि कसाई' असे करता येईल. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला, असा थेट आरोप अॅड शेलार यांनी केला आहे.


टेंडरविना काम आहे, टेंडर पेक्षा जास्त काम दिली आहेत, टेंडर पडताळणी विना, टेंडर अपात्र असलेल्यांना कामे दिली आहेत. काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर दिले पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी शर्तीचा भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


परेल टीटी उड्डाण पुल, मिठी नदी अशा प्रकारे वरळी, वांद्रे मातोश्री जवळची अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळ्याची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, हे उघड व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट