निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना दिले खुले आवाहन

म्हणाले तुम्ही देवावर हात ठेवा आणि...


सिंधुदुर्ग: मागील काही काळामध्ये आमदार वैभव नाईक शिंदेसोबत यायला तयार होते, मात्र त्यासाठी त्यांनी राणे जर कुडाळ - मालवण मधून निवडणूक लढणार नसतील आणि मला कुडाळ - मालवण मधून तिकीट मिळणार असेल तर मी यायला तयार आहे, अशी अट टाकल्याचा गौप्यस्फोट भाजप प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी केला. यावेळी त्यांनी वैभव नाईक असं बोलले की नाही? असा सवाल करत ते ज्या मंदिरात सांगतील त्या मंदिरात मी यायला तयार आहे. त्यांनी देवावर हात ठेवून सांगावं ही चर्चा झाली की नाही, असं आवाहनच दिलं.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटणाऱ्या वैभव नाईकचा निष्ठा या शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे निष्ठेच्या वार्ता वैभव नाईक याने करू नये. असाही जोरदार प्रहार वैभव नाईक यांच्यावर निलेश राणे यांनी केला. निलेश राणे म्हणाले, नाईक तुम्ही शिंदे साहेबांकडे किती वेळा जाऊन काय काय बोललात? किती कामे करून घेतली? कधी कुठे कुठे कसे भेटलात? हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही निष्ठेच्या वार्ता करु नका.


माजी खासदार निलेश राणे व वैभव नाईक यांच्यातील राजकीय वाद काही जुना नाही. मात्र वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली कामे करून घेतली. असे असताना ते उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं सांगतात. मात्र, स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी, मी आमदार राहिलो पाहिजे या गणितामुळे त्यांना उद्धव ठाकरेंशी देणंघेणं नाही असं खळबळजनक विधान माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक