डोंबिवली (वार्ताहर) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मूमधून १५ मुले दाखल झाली आहेत. मंगळवारी सकाळी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात त्यांनी संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. सायंकाळी भागशाळा मैदान येथे जम्मू कश्मीर येथील हे विद्यार्थी पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत.
हम या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू-काश्मिरचे विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान-प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी हाती घेतला आहे. यावर्षी संस्कार भारतीचे डोंबिवलीकर कलाकार असणारे उमेश पांचाळ यांना रांगोळी प्रशिक्षणा संदर्भात विचारले असता त्यांनी लगेच होकार दिल्याची माहिती हम संस्थेच्या नंदिनी पित्रे यांनी दिली. या मुलांमध्ये ३ मुले, तर १२ मुली काश्मीरहून आल्याचे हम संस्थेने नमूद केले. हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील आहेत.
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…