गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण, उत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वितरीत करण्यात येणार आहे.


राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी सर्व ठिकाणी आयोजित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.


राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहे. हा ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीकरिता ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


शिधाजिन्नस खरेदी करण्याकरिता ४५५.९४ कोटी रुपये व इतर अनुषंगिक खर्च १७.६४ कोटी रुपये अशा एकूण ४७३.५८ कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय यापूर्वीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना