Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात काही पुरावेही समोर आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. “चुकी करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मंत्री नितेश राणे म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील विराट हिंदू संमेलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. घरच्यांनीही चुकीला साथ देऊ नये,” असे ते म्हणाले.



सर्व पुरावे टप्प्याटप्प्याने समोर येत असून संबंधित विभाग तपास करत आहेत. निदा खान प्रकरणावर भाष्य करत त्यांनी काही घटनांशी संबंधित दुव्यांचा उल्लेख केला असून याबाबत अधिक तपास होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. टाटा ग्रुप कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले आणि अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, चुका झाल्यास त्या सुधारल्या पाहिजेत. पीडितांना आवाहन करताना राणे म्हणाले की अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या पोलिसांकडे पाठवण्यात येत आहेत. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल आणि संबंधितांकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांनी सध्याचे सरकार कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचे सांगितले. रॅली विरोधाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत कायद्याचे पालन करण्याचा इशारा दिला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना राणे म्हणाले की, “चुकीला चूक आणि योग्यला योग्य म्हणण्याची आमची भूमिका आहे. कोणतीही तडजोड केली जाणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. अशोक खरतचा विषय असू दे नाहीतर टीसीएसचा जे दोषी असतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा होणारच, अशी ग्वाही मंत्री नितेश राणेंनी दिली.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम