Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती


मुंबई : राज्य शासनाने गुरुवारी प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे फेरबदल करताना चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, मागील काही काळापासून या पदाची जबाबदारी सांभाळणारे जितेंद्र पापळकर यांची मुंबईत जीएसटी विभागात बदली करण्यात आली आहे.


सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी सायंकाळी उशिरा या बदल्यांचे आदेश काढले. २००९ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी जी. श्रीकांत हे नवी मुंबई येथे जलजीवन मिशनचे अभियान संचालक म्हणून कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार आता त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर, २०१० च्या तुकडीचे अधिकारी जितेंद्र पापळकर यांची छत्रपती संभाजीनगरहून बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती मुंबईत वस्तू व सेवा कर विभागाच्या संयुक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. याच बदल्यांच्या साखळीत २०१३ च्या तुकडीचे अधिकारी गंगाथरण डी. यांची जलजीवन मिशनच्या (नवी मुंबई) अभियान संचालकपदी वर्णी लागली आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे (नवीन शहर) मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत असलेले जगदीश मिनियार (२०१५ तुकडी) यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुणे येथील महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "