मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विशेषत: खलनायकाच्या भूमिका करणाऱ्या दीपक तिजोरीसोबतच एकाने खलानायकी केली आहे. एका चित्रपट निर्मात्यानेच आपली २.६ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरीनं केला आहे. दीपकनं मुंबईमधील आंबोली पोलीस स्थानकात याची तक्रार दाखल केली. दीपकनं जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी निर्माता मोहन नाडरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आंबोली पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक तिजोरीनं सांगितले की, २०१९ मध्ये त्याने आणि मोहन नाडरने टिप्सी नावाच्या चित्रपटासाठी कॉन्ट्रेक्ट केले होते. त्यावेळी नाडरने दीपक तिजोरीकडून लंडनमध्ये चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी पैसे घेतले होते, ते परत मागितल्यावर त्याने दीपक तिजोरीला एकापाठोपाठ एक चेक दिले, परंतु ते सर्व बाऊन्स झाले.
दरम्यान, पोलिसांनी मोहन नाडर याच्यावर कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
दीपक तिजोरीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जो जीता वही सिकंदर, छोटी बहू, सडक, आशिकी, कभी हा कभी ना, अंजाम यांसारख्या चित्रपटांमुळे दीपकला विशेष लोकप्रियता मिळाली. टॉम, डिक अँड हॅरी या चित्रपटाचं दीपकनं दिग्दर्शन केलं.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…