जे. जे. रुग्णालयातील १२२ बदली कामगार कामावर दाखल

कामाचा ताण काही अंशी कमी


मुंबई (प्रतिनिधी) : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी तीन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. या संपामुळे रुग्णालयीन कामकाजावर ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जे.जे.रुग्णालयातील १२२ बदली कामगारांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेत कामावर दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णालयावरील कामाचा ताण काही अंशी कमी झाला आहे.


जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील १८ लाख शासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची मोठी संख्या असलेल्या जे.जे. रुग्णालयातील बदली कामगारांनी बेमुदत संपावर न जाण्याचा निर्णय घेत रुग्णालयावरील ताण कमी केला आहे.


जे.जे. गेली २५ ते ३० वर्षे रुग्ण सेवा करणारे जे.जे. रुग्णालयातील बदली कामगार कायम सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. औद्योगिक न्यायालयाने २७ जुलै २००३ मध्ये आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मॅट कोर्टाने जे. जे. रुग्णालयातील बदली कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घ्या असे आदेश राज्य सरकारला दिले होते. दोन्ही न्यायालयाने आदेश देऊनही बदली कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्यास टाळाटाळ केली जात असून जे.जे. रुग्णालयातील बदली कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. २५ वर्षांपासून लढा देणाऱ्या ११८ कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.


कोविड काळातही १२ ते १६ तास ड्युटी करून जबाबदारी पार पाडली. कोविड काळात ५० हून अधिक बदली कामगारांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोनामुळे दोन बदली कामगारांचा मृत्यू झाला. आता राज्यातील १८ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. अशा वेळी आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपात सहभागी होता आले असता. मात्र रुग्णालय प्रशासन व विशेष करून रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी कामगार कामावर रुजू झाल्याचे जे.जे. रुग्णालयातील बदली कामगारांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री