पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना पक्षाचे नेते पवन खेरा यांना आज आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली होती. याबाबत वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.


खेरा यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने दुपारी ३ वाजता सुनावणी सुरू केली आणि सुमारे ३५ मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटिसाही बजावल्या आणि तीन ठिकाणी नोंदवलेले खटले एकाच अधिकारक्षेत्रात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आसाम सरकारच्या वतीने एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी युक्तिवाद केला.


आज सकाळी खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवले आणि त्यानंतर आसाम पोलिसांनी अटक केली. रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले.


पवन खेरा २० फेब्रुवारी रोजी पत्रकारांशी बोलताना "जेव्हा अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तेव्हा नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे." असे म्हटले. त्यांनी दामोदरदास मोदींना म्हणजेच मोदींच्या वडिलांना गौतमदास मोदी असे संबोधल्याने, याच दिवशी लखनऊ महानगर भाजपचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. वाईट हेतूने त्यांनी हे विधान केले आहे.

Comments
Add Comment

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे

Tesla Model Y: टेस्ला घेणारे पस्तावले, फोडतायत काचा!

१,७४,००० टेस्ला मॉडेल वाय कारची चौकशी सुरू! नवी दिल्ली: हाय-टेक फीचर्स आणि तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या

काँग्रेसला हाय कोर्टाचा दणका! पंतप्रधानांच्या आईचा AI व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे दिले आदेश

पाटणा: पाटणा उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचे चित्रण