सासूच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

कोटा: कोटा येथे सासूच्या जाचाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. आत्महत्येनंतर तीन दिवसांनी तरुणाच्या पर्समधून सापडलेल्या सुसाईड नोटवरून या प्रकरणातील धक्कादायक खुलासे झाले आहेत. मृत चेतन जांगीड हा केशवपुरा सेक्टरचा रहिवासी होता. चेतनने चार दिवसांपूर्वी स्वत:च्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले होते. सासरच्या मंडळींना मारहाण करून लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करत मृताच्या नातेवाइकांनी न्यायाची याचना केली आहे.


चेतनने आपल्या भावना सुसाईड नोटमध्ये लिहून सासूला तुरुंगात पाठवण्याबाबत आणि त्याच्या संपत्तीतील हिस्सा पत्नीला न देण्याबाबत लिहिले आहे. चेतनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की, 'मी आणि पूजा दोघेही एकत्र राहत होतो. माझे सासु आणि सासरे माझ्याकडे पैशाची मागणी करायचे. मी माझ्या मुलांचे पोट भरण्यासाठी कष्ट करायचो.


माझ्या सासु-सासऱ्यांनी पूजाचे दागिनेही विकले. ते माझ्या मुलांना स्वत: जवळ ठेवून दोन लाख द्या आणि मुलांना घेऊन जा, असं धमकवायचे. मी त्यांना दोनदा आणायला गेलो असता त्यांनी मला बेदम मारहाण केली. ते मला जबरदस्ती करत होते की तू तुझ्या आई-वडिलांच्या घराचा हिस्सा माग. माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकून मी हैराण होतो.



सासू मला मारण्यासाठी भूत आणायची


चेतनने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले की, मला मारण्यासाठी माझी सासू काळ्या जादूचा आधार घेत भूत आणत असे. मी माझ्या दोन मुलांशी आणि पूजाशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. पुजाला मी तुझ्या आईकडून दागिने घेऊन ये असे सांगितले. पण ती तिच्या आईने दागिने तिचे विकले आहेत, असे सांगायची.
चेतनने १५ फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महावीर नगर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे