अभ्यासासाठी रागवली म्हणून मुलानेच आईला गळा दाबून संपविले

पुणे: अभ्यास करताना मोबाइलमध्ये लक्ष असल्याने ओरडल्याबद्दल बारावीतील विद्यार्थ्यानेच आईचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथुन समोर आला आहे. याबाबत पोलीसांनीच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत घडली.


याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी जिशन जमीर शेख (वय १८) या मुलाला अटक केली आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तस्लीम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला. याबाबत पुढील चौकशी केली असता सुरुवातीला कोणीच काही माहिती द्यायला तयार नव्हते पण नंतर मुलानेच त्याचा गुन्हा कबूल केला.


या घटनेचा घटनाक्रम असा की, जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा जिशान हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाइल पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली. ती जिशानला रागविली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे जिशान याने आईला जोरात भिंतीवर ढकलले आणि तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यू झाला.


आई निपचित पडल्याचे पाहून जिशान घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. मात्र मृत्यू झाला असल्याने रक्त आले नाही. त्याने वायर पंख्याला अडकविली. फरशीवर आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यांनी तस्लीम यांना रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. शवविच्छेदनात खुनाचा प्रकार समोर आला. याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्यावतीने फिर्याद देण्यात आली असून मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत़.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी