देवगड अर्बन बँकेवर आमदार नितेश राणे यांचे वर्चस्व

देवगड (प्रतिनिधी) : देवगड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा व नंदूशेठ घाटे पुरस्कृत शिवम सहकार पॅनेलने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असून बाराही जागा जिंकत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनलचा धुव्वा उडविला आहे. देवगड अर्बन बँकेची निवडणुक भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवम पॅनल व शिवसेना काँग्रेस पुरस्कृत सहकार समृध्दी पॅनल या दोन पॅनलमध्ये झाली. ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली. या निवडणुकीमध्ये एकूण १३ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली होती तर उर्वरीत १२ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.



सोमवारी अर्बन बँक कार्यालयात मतमोजणी पार पडली. यामध्ये बाराही जागांवर शिवम पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवम सहकार पॅनलमधून विजयी झालेले उमेदवार सर्वसाधारण गटातून सदाशिव ओगले (१९४५), प्रकाश राणे (१८०८), अभय बापट (१९४३), अ‍ॅड. अभिषेक गोगटे (१९३६), डॉ. अमोल तेली (१८४३), दिनेश नंदकुमार घाटे (२०७२), समीर पेडणेकर (१९३१), महिला राखीव गटातून सौ. वैशाली तोडणकर (१९७७), ललिता शेडगे (१९३८) इतर मागास प्रवर्ग गटातून महादेव उर्फ बाबा आचरेकर (२१७५), अनु.जाती/जमाती गटातून सुरेंद्र चव्हाण (२१४३), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून संजय बांदेकर (२१०९) हे उमेदवार विजयी झाले. तर या पॅनलचे सर्वसाधारण गटातील देवगड तालुक्याबाहेरील उमेदवार अनिल उर्फ बंड्या सावंत हे बिनविरोध निवडून आले. सहकार समृध्दी पॅनलमधील उमेदवारांना मिळालेली सर्वसाधारण गटातून अब्दुल रशिद अली खान (९९७), उल्हास मणचेकर (११५४), संतोष तारी (११३१), किरण टेंबुलकर (१०२७), रघुवीर वायंगणकर (९५७), महिला राखीव गटातून विशाखा मांजरेकर (१२०२), सुगंधा साटम (९७६), इतर मागास प्रवर्ग गटातून मनोज पारकर (१००३), अनु.जाती/जमाती गटातून सुरेश देवगडकर (१०४४), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून धनंजय जोशी(१०७२) मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवम पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. शिवम पॅनलचे सर्वेसेर्वा नंदकुमार घाटे, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. प्रकाश बोडस, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, माजी चेअरमन भाई आचरेकर यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, मुकूंद फाटक, महिला तालुकाध्यक्षा सौ. उष:कला केळूसकर, माजी जि.प.सदस्या सौ. सावी लोके, माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, भाजयुमो शहरअध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका सौ. प्रणाली माने, सौ. तन्वी चांदोस्कर, प्रकाश गोगटे, शरद शिंदे, मंगेश लोके, निलेश पेडणेकर, नागेश आचरेकर आदी उपस्थित होते. निवडणुकीसाठी माणिक सांगळे हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निबंधक देवगड अनिल राहीज व उर्मिला यादव यांनी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक