'सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार'

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणणार असल्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच लव्ह जिहाद कायदा आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधात कायदा करावा या मागणीसाठी आज सकाळी मुंबईत 'सकल हिंदू समाजा'च्या वतीने 'हिंदू जन आक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला मोर्चा प्रभादेवी कामगार मैदानावर संपला. या मोर्चात हिंदू संघटनांचे नेते तसेच भाजप आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते.


ते पुढे म्हणाले, मुंबईतील हिंदूंचा हा मोर्चा तुम्ही पाहिला आहे. हिंदूंची संख्या वाढल्याने शक्तीही अधिक आहे. त्यामुळेच आता हे बांगलादेशी, रोहिंग्या, जिहादी विचारसरणीचे लोक मुंबईत येऊन मुंबईतील हिंदूंची संख्या कमी करत आहेत. लँड जिहाद आणि लव्ह जिहाद करण्याचा कट रचणाऱ्यांना मुंबईतील आमच्या माता-भगिनी चोख उत्तर देऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी आजचा मोर्चा आहे.



हे हिंदूंचे भगवे वादळ


हे हिंदूंचे भगवे वादळ असल्याचा एल्गारही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते म्हणाले, हे भगवे वादळ आता थांबणार नाही. जिहादी पोसण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईचा डीएनए भगवा आहे. आमचे रक्त भगवे आहे हे मुंबईकरांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या