भाईंदरमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानमित्त जनजागृती कार्यक्रम

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय मतदार दिनानमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्र विभागाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या मतदार जनजागृती कार्यक्रमात एकूण ६८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात विनय पाल व झोहराशेख या विद्यार्थ्यांनी 'मतदानाचे महत्व' या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यासोबतच मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला मतदार नोंदणी अधिकारी १४६ ओवळा माजिवाडा मतदार संघ यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले होते. ठाणे तहसिलदार आशिष बिरादर व मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग अधिकारी योगेश गुनिजन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अभिनव महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ आणि प्राचार्य डॉ.आॉल्विन मेनेजेस यांनी देखील कार्यक्रमा दरम्यान प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे लिपिक संतोष पेढणेकर यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरूणा गूजर, प्राध्यापक नितिन सोनावणे यांनी कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Comments
Add Comment

ठाण्यात 'जय श्रीराम'वाला महापौर बसवा; नाहीतर 'हिरवे' गुलाल उधळतील!

मंत्री नितेश राणे यांचा इशारा ठाणे : ''एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने

मुरबाड तालुक्यात १५ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन

मुरबाड :मुरबाड तालुक्यातील धसई येथे १५ जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा

निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्या पवार स्कूलच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कल्याण: कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ चे कामकाज पारदर्शक, सुरळीत आणि विहित वेळेत

कल्याण पूर्वेतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बलात्कारातील आरोपी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. २१ वर्षीय एअर

ठाण्यात महायुतीचा वचननामा जाहीर

ठाणे स्मार्ट व ग्लोबल शहर बनवण्याचा निर्धार ठाणे  : महायुतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा

मंत्री नितेश राणे आज ठाण्यात

सीताराम राणे यांचा करणार प्रचार ठाणे  : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५-ड चे भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीचे