शिंदे गटाच्या जागांवर भाजपचा दावा नाही

पुणे: शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदार संघात कमळ फुलणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांना पुर्ण विराम दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदार संघाचे आमदार असल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या जागा या त्यांच्याच राहतील असे स्पष्ट केले आहे.


पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कार्यक्रमाला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत या मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप या जागांवर निवडणूक लढवणार का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावेळी शिंदे गटाच्या जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


दरम्यान भाजपच्या लोकसभा मिशनबाबत अधिक माहिती देताना, देवेंद्र फडणवीस यांनी हे मिशन भारतव्यापी त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यापीही असेल असे म्हटले. याचवेळी बारामती महाराष्ट्रात आहे, असा टोला त्यांनी लगावला.


भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Comments
Add Comment

'टीईटी परिक्षेबाबत अफवांवर विश्वास नको'

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२५

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क

मुख्यमंत्री असताना कधी घराबाहेर पडले नाही, पराभवानंतर आता लोकांमध्ये जाण्याची जाणीव झाली!

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांचे धारदार टीकास्त्र नागपूर : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या

राज ठाकरे संतापले; निष्क्रिय शाखाध्यक्षांना थेट काढून टाकण्याचे आदेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कमालीचे संतप्त

मुख्यमंत्री फडणवीसांकडून 'ॲक्शन' : पार्थ पवारांच्या कंपनीवरील जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू; तहसीलदार निलंबित!

कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात मोठी घडामोड; 'या' अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई मुंबई : उपमुख्यमंत्री

Sambhajinagar Younger Viral Video : संभाजीनगर नामफलकाखाली लघुशंका करणे जीवावर बेतले; धमक्यांना कंटाळून तरुणाची विहिरीत उडी!

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे झालेल्या सततच्या धमक्या आणि मानसिक त्रासाला