के एल राहुल-आथियाचे सनई चौघडे वाजले; जोडप्याचा हनीमुनला नकार

खंडाळा : के एल राहुल आणि आथिया शेट्टी अखेर लग्नबंधनात अडकलेच. ज्या गोष्टीची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा होती त्याचे याची देही याची डोळा दर्शन करण्यासाठी प्रचंड आतूरता आहे. त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अभिनेता संजय दत्त यांनी त्यांना ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्याने लग्न झाले असून केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून सुनील शेट्टी यांची कन्या आथिया शेट्टी, के एल राहुल सोबत लग्नबंधनात अडकणार अशी उत्सुकता होती. जावईबापुंच्या आणि लेकीच्या लग्नसोहळ्यासाठी सुनील शेट्टी आणि परिवाराने खंडाळ्यातील फार्म हाऊसवर जय्यत तयारी केली होती. या सोहळ्याला त्यांच्या उपस्थितीने कोण चार चाँद लावणार याची उत्सुकता असतानाच क्रिकेटपटू इशांत शर्मा तर अभिनेता अर्जुन कपूरही लग्नाला पोहचला.


https://twitter.com/duttsanjay/status/1617425893814861824

विराट कोहली, अनुष्का शर्मा, सलमान खान शाहरुक खानही या विवाहाला उपस्थितीती लावली. अत्यंत मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेतच. दरम्यान अभिनेत्री इशा देओल आणि अनेक तारे तारकांनी या नवीन सेलिब्रिटी जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.



प्रेमप्रकरणाची सुरु होती चर्चा


आथिया आणि राहुलच्या प्रेमप्रकरणाची गेली कित्येक दिवस समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये चर्चा होती. अनेक बातम्या अफवा ठरतात की काय अशी शक्यता असताना अचानक या लग्नावर शिक्कामोर्तबच झाले आहे.



हनीमुनला जाणार नाही


दरम्यान या नवविवाहित जोडप्याने हनीमुनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील शेट्टी लाडक्या लेकीला काय गिफ्ट देतात याकडेही सर्वांच लक्ष लागून आहे.



लग्नातील जेवण अन् संगीत


दरम्यान या लग्नातील संगीत सोहळ्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. सुनील शेट्टी आणि परिवार अत्यंत जोरदार नाचताना दिसत आहेत. या लग्नात केळीच्या पानावर जेवण वाढण्यात आल्याने या लग्न सोहळ्यात वेगळाच आनंद उपस्थितांना घेता आला.

Comments
Add Comment

दीपिका करणार कमबॅक! २०२६ मध्ये बिग बजेट चित्रपटांमधून झळण्याची शक्यता

मुंबई: बॉलीवूडची ग्लॅम अभिनेत्री दीपिका पादुकोण २०२५ मध्ये अनेक वादांमध्ये अडकली. तिच्या आठ तास काम करण्याच्या

'इक्किस' चित्रपटात दिसलेला अगस्त्य नंदा आणि बच्चन कुटुंबियांचे नाते काय?

मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत