मुंबई : एकीकडे निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष कुणाचा यासाठी कायदेशीर लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार आहे. या दुहेरी संकटामुळे उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढले असून ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे संघटनात्मक निवडणुकांसाठी विनंती केली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारीला संपणार आहे. २३ जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची ५ वर्षे पूर्ण होत आहेत. २३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदी निवड झाली होती. ही निवड ५ वर्षांसाठी असते. याच पार्श्वभूमीवर संघटनात्मक प्रमुख निवणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
शिवसेनेचा धनुष्यबाण कुणाच्या हाती जाणार? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मंगळवारी शिंदे-ठाकरे या दोन्ही गटाने युक्तिवाद केला. आमदार-खासदारांचे बहुमत आमच्याकडेच असल्याने धनुष्यबाण आम्हाला मिळावे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पद निर्माण करणे हे बेकायदेशीर होते. शिवसेनेची घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. घटनेत पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याची तरतूद नव्हती, असे सांगत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदावर प्रश्न उभे केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा या पदावर निवड करताना ठाकरे गटाला कसरत करावी लागणार आहे.
२०१८ साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदावर निवड झाली होती. मात्र २०२३ मध्ये उद्धव ठाकरेंची निवड करताना संघटनात्मक निवडणुका घ्यावा लागतील. परंतु यंदा शिवसेनेत शिंदे-ठाकरे असे २ गट पडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे पद पुन्हा मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…