एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा अटकेत

बंगळुरू : न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत लघुशंका करणा-या शंकर मिश्रा याला बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे.


शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस लोकेशन ट्रेस करत होते. शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बंगळुरुमध्ये सापडले होते. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा शोध घेण्यात आला. मात्र, मिश्रा त्याचा फोन सातत्याने बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्यात बंगळुरु पोलिसांना यश आले आहे.


२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशी महिलेवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.


शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोने त्याला नोकरीवरुन काढून टाकले आहे. कंपनीच्यावतीने एक निवेदन जारी करताना, म्हटले होते की, कंपनी आपल्या कर्मचा-यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करु, असेही कंपनीने म्हटले आहे.

Comments
Add Comment

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी

बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय

पाटणा : बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत एनडीएच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. विधानसभेनंतर