अयोध्येत 'महाराष्ट्र भवन' होणार

मुंबई : अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगी यांनी तत्वतः मंजुरी दिली.


मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार असल्याचेही सांगितले. त्यावर योगिनी समाधान व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आमंत्रित करून अयोध्येला आवर्जून भेट द्यावी असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.


योगी आदित्यनाथ यांना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारचीही विशेष भेट घेतली. योगींनी उत्तर प्रदेशातल्या फिल्मसिटीबाबत अक्षयशी विशेष चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.


योगी आदित्यनाथ आपल्या या दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते विविध उद्योगपतींसोबत वन टू वन बैठक घेणार आहेत.

Comments

U D Thakare    January 6, 2023 06:48 AM

Maharashtra bhavan in Ayodhya is best move.Ensure low charges for common man.It may not be like Maharashtra Sadan in Delhi, where common man cannot stay.

Add Comment

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार