म्हाडाचे घर घेण्यासाठी आता फक्त ६ कागदपत्रे लागणार

मुंबई : म्हाडाचे घर घेण्यासाठी कागदपत्राची संख्या २१ वरुन आता केवळ सहा ते सात कागदपत्रांवर आणत म्हाडाने प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. त्यामुळे म्हाडाचे घर घेणे आता सोपे होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


म्हाडाच्या सोडत प्रक्रियेमध्ये आतापर्यंत सोडतीनंतर अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यात येत होती. अर्ज भरताना २१ कागदपत्रे जोडणे गरजेचे होते. पण आता म्हाडाने ही सर्व प्रक्रिया एका अॅपद्वारे आणि कमी कागदपत्रांसह राबवण्याचा निर्णय घेतला आहे.


म्हाडाच्या नवीन पद्धतीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने करण्यात येईल. यासाठी केवळ सात कागदपत्राची आवश्यकता असेल. अर्जदाराने जोडलेली कागदपत्र डीजी लॉकरमध्ये सुरक्षित राहणार आहेत. घरे मिळाल्याची माहिती अर्जदाराला एसएमएस व ईमेलद्वारे दिली जाणार आहे.



फक्त ही कागदपत्रे आवश्यक


१. ओळखीचा पुराव्यासाठी आधारकार्ड व पॅनकार्ड (आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक)
२. स्वघोषणापत्र
३. अर्जदाराच्या आधारकार्डवरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा वास्तव्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
४. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र - तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र
५. स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा - आयकर परतावा किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा. (पती/ पत्नीच्या उत्पन्नाचा पुरावाः नोकरी असल्यास पती- पत्नीचा आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा पुरावा आणि स्वयंघोषणापत्र)
६. जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर प्रवर्गानुसार प्रमाणपत्र

Comments
Add Comment

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी

दहिसर–जुहू रडार स्थलांतर आणि Housing for All; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाचं निवेदन

मुंबई : मुंबईतील तील रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी ‘Housing for All’ अंतर्गत नवीन धोरण मांडण्यात आले आहे. फनेल

मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा