सावंतवाडीत ५ जानेवारी रोजी भव्य रोजगार मेळावा

'आजच मुलाखत - आजच निवड' संकल्पना राबवणार


सातशेहून अधिक युवक-युवतींना मिळणार रोजगार


कोरोनात नोकरी गमवलेल्या अनेक तरुणांना रोजगाराची संधी


सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण पिढीला रोजगार देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' यांनी येत्या ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे संध्याकाळी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरोजगारांची संख्या वाढती आहे. येथील युवा पिढीला नोकरीसाठी पुरेशा संधी मिळत नाहीत. त्यामुळे येत्या ५ जानेवारी २०२३ रोजी सावंतवाडीत होणारा हा रोजगार मेळावा येथील स्थानिकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' या भारतीय डिजिटल तंत्रज्ञान कंपन्यांनी डिझाइन केलेले एज डेटा सेंटर गोव्यात पणजी येथे सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही डेटा सेंटर लवकरच सुरु होणार असून त्यामुळे युवा पिढीला सिंधुदुर्गातही रोजगार प्राप्त होईल.


या रोजगार मिळाव्यात महाराष्ट्र आणि गोव्यातील २२ कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध होईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध कंपन्यांमध्ये थेट नोकरी मिळेल. ॲडमिशन कंपनी 'आजच मुलाखत; आजच निवड' या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी देणार आहे. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.


या रोजगार मिळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीबी बँक, आदित्य बिर्ला, पेटीएम, विवो, जस्ट डायल, ग्लेनमार्क, गोयंम ऑटो, यशस्वी ग्रुप, मुथूट फायनान्स, व्ही ५ ग्लोबल सर्व्हिस, टाटा ट्रेंट, डीके असोसिएट्स, टेली परफॉर्मन्स, स्टे बर्ड हॉटेल आदी प्रमुख कंपन्या दाखल होणार असून याद्वारे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. एकंदरीत 'ॲडमिशन', 'व्हॅरेनियम क्लाउड' आणि 'सिक्योर क्रेडेंशियल्स' या कंपन्यांनी सिंधुदुर्गातील युवा पिढीचे भविष्य घडविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

Comments
Add Comment

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे